Ad will apear here
Next
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची वॉर-रूम कार्यान्वित
आठही मतदारसंघांसाठी सोशल मीडिया टीम सज्ज
भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळपुणे : ‘विधानसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाची शहरातील आठही विधानसभा मतदारसंघांसाठी वॉर-रूम कार्यान्वित झाली आहे. शहरातील प्रत्येक मतदारापर्यंत भाजपची सोशल मीडिया टीम पोचणार असून, आठही विधानसभा मतदारसंघांसाठी ही टीम एकत्रित काम करणार आहे,’ अशी माहिती भाजपच्या शहराध्यक्षा माधुरी मिसाळ यांनी रविवारी (८ सप्टेंबर) पत्रकार परिषदेत दिली.    

‘विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पुणे शहरातील वॉर-रूम प्रदेश आणि केंद्रीय वॉर-रूमला संलग्न असेल. पक्षाच्या शहरातील मुख्यालयातून या ‘वॉर रूम’चे काम चालणार आहे. शहरातील टीम, तसेच प्रत्येक विधानसभा मतदारसंघासाठी एक प्रभारी असेल. त्याच्या मदतीसाठी दहा जणांची टीम असेल. पुणे शहरात सुमारे १०० युवकांची टीम काम करणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने गेल्या पाच वर्षांत मतदारांपर्यंत पोचविलेल्या योजनांची माहिती देतानाच तिहेरी तलाक रद्द करणे, कलम ३७० रद्द करणे, चांद्रयान, सार्वजनिक स्वच्छता, मेट्रो आदींबाबत घेतलेल्या प्रमुख निर्णयांचीही माहितीही मतदारांपर्यंत पोचविण्यात येणार आहे,’ असे मिसाळ यांनी सांगितले.

‘फेसबुक, व्हॉटसअप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदींच्या माध्यमातून भाजप मतदारांपर्यंत पोचणार आहे. त्यासाठी विधानसभा मतदारसंघनिहाय व्हॉटसअपचे ग्रूपही कार्यान्वित करण्यात आले आहेत. पर्वती, खडकवासला, कोथरूड, शिवाजीनगर, हडपसर, कॅंटोन्मेंट, वडगाव शेरी, आणि कसबा विधानसभा मतदारसंघात भाजपच्या आठही आमदारांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या मार्फत कोणती विकास कामे केली आहेत, याचीही माहिती मतदारांना मिळणार आहे. ‘पीएमआरडीए’चा विकास आराखडा, रिंगरोड, विमानतळ विस्तारीकरण, नव्या ई-बस, मेट्रोचे विस्तारीकरण, झोपडपट्टी पुनर्विकास योजनेसाठीच्या नियमावलीतील सुधारणा आदींचा त्यात समावेश आहे. सोशल मीडियावर मतदारांच्या मिळणारा प्रतिसाद, त्यांच्या सूचना भाजपच्या वॉर-रूममध्ये नोंदविण्यात येणार आहेत,’ असेही मिसाळ यांनी सांगितले.  
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/HZXPCE
Similar Posts
महाजनादेश यात्रेच्या प्रचारार्थ डिजिटल चित्ररथ सज्ज पुणे : महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने भारतीय जनता पक्षाचे सदस्य, ज्येष्ठ पत्रकार व कॅटलिस्ट फाउंडेशनचे अध्यक्ष सुनील माने यांच्या संकल्पनेतून साकारण्यात आलेल्या चित्ररथाचे उद्घाटन नुकतेच पुण्यात खासदार गिरीश बापट यांच्या हस्ते झाले.
सिद्धार्थ शिरोळे यांच्या प्रचाराला सुरुवात पुणे : भारतीय जनता पक्ष, शिवसेना, आरपीआय (ए), रासप, शिवसंग्राम, रयतक्रांती महायुतीचे शिवाजीनगर मतदार संघातील अधिकृत उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांनी शुक्रवारी सकाळी डेक्कन बसस्थानकाजवळील गरवारे चौकातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करून आपल्या प्रचाराला सुरुवात केली.
पानशेत पूरग्रस्तांच्या सोसायट्यांबाबत पैसे भरण्याच्या कार्यवाहीला सुरुवात करावी पुणे : शहरातील पानशेत पूरग्रस्तांच्या १०३ सहकारी गृहनिर्माण संस्थांना जीआरद्वारे देण्यात आलेल्या जमिनी या संबंधित सोसायट्यांच्या मालकीच्या करण्याचे आदेश राज्य सरकारने मार्च महिन्यात काढले आहेत. या आदेशाची पूर्तता करण्याच्या दृष्टीने त्यासाठी आकारण्यात आलेल्या भाडेपट्टीचे पैसे भरण्याची मुदत आठ सप्टेंबर, २०१९ रोजी पूर्ण होत आहे
महायुतीला २२०पेक्षा अधिक जागा मिळतील; चंद्रकांत पाटील यांचा विश्वास मुंबई : ‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रियतेमुळे भाजप महायुतीला विधानसभा निवडणुकीत २२०पेक्षा अधिक जागा मिळतील,’ असा विश्वास भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language